मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य केल्याने श्रीगोंदा शहरा सह गणपती मळ्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने पेढे वाटून फटाके व डिजे वाजवून गुलालाची उधळन करून आनंदोत्सव साजरा केला*
श्रीगोंदा- नितीन रोही,
: मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून राज्य सरकारने आदेश काढल्याने श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्यावतीने एकच जल्लोष केला. श्रीगोंदा शहरातील गणपती मळा आणि शनी मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पेढे वाटून तसेच फटाक्याची आतिशबाजी करत डीजे वाजून गुलालाची उधळन करून आनंदोत्सव साजरा केला.
मराठा आरक्षणाचा लढा जागतिक पातळीवर गेला असून एक मोठा समाज रस्त्यावर उतरून किती शांततेच्या मार्गाने लढा उभा करू शकतो याचे आदर्श उदाहरण आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या अडचणी होत्या त्या यानिमित्ताने दूर होतील. या आंदोलनाने महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेतून कसा राहू शकतो हे दाखवून दिले आहे.एक सामान्य माणूस काय क्रांती करू शकतो याचे नव उदाहरण मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.
श्रीगोंदा शहरातील व गणपती मळा परिसरातील युवकांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम समजले जाणारे श्री संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीला शेरा चढवून पेढे वाटून डीजेच्या तालावरती आनंद उत्सव साजरा हे एक मेव महाराष्ट्र मधील एकमेव ठिकाण आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा