टेंभुर्णी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे निधन
टेंभुर्णी,ता.19 : शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी या संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक व टेंभुर्णी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सुभाष ज्ञानदेव चव्हाण ( वय- 68 ) यांचे अल्पश: आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना नातवंडे, दोन भाऊ व बहिणी असा परिवार आहे. कै.सुभाष चव्हाण यांनी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव व चेअरमन ही पदे भूषविली आहेत.ते सेवानिवृत्त तालुका पुरवठा अधिकारी होते. टेंभुर्णीतील जनता विद्यालयातील सहशिक्षक सचिन चव्हाण व विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातील कर्मचारी गणेश चव्हाण यांचे ते वडील होत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा