Breaking

शुक्रवार, १० मार्च, २०२३

माढा तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज सावंत यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न*



*माढा तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज सावंत यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न*



टेंभुर्णी ( प्रतिनिधी) भारत जगताप 
  भैरवनाथ शुगर आलेगाव, तालुका माढा या कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कारखाना साइटवर साजरा करण्यात आला. पृथ्वीराज सावंत हे भैरवनाथ शुगर या कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. ते शिंदे गटाचे शिवसेना युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांची युवकांमध्ये चांगली फळी आहे. त्यामुळे सर्व कामगारांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला आहे. 

यावेळी कारखान्याची असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ, शेती अधिकारी विजय खटके, वडोलीचे उपसरपंच तानाजी गाडे, आलेगावचे नेते पंढरी काका चंदनकर, आलेगावचे मा सरपंच संतोषआप्पा चंदनकर, टाकळीचे नेते टकले सरपंच, तांबवे सरपंच, आडेगावचे नेते अनपट, रांजणीचे बाळासाहेब उबाळे, नगोरलींचे संतोष ढवळे याचबरोबर विविध विभागातील सर्व कर्मचारी वृंद,  कामगार, कोंढार भागातील विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा