युनियन बँकेचे उद्या होणार नवीन जागेत स्थलांतर बँकेचे व्यवस्थापक एम एम टीकटे यांनी दिली माहिती
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मेन रोड वरील असणारी राष्ट्रीयकृत बँक युनियन बँक ही उद्या 14 नोव्हेंबर रोजी देवीचा माळ रोडवरील शाहूनगर येथे स्थलांतर होणार असल्याची माहिती बँकेचे मॅनेजर एम एम टिकटे यांनी दिली
करमाळा शहरातील प्रामुख्याने व्यापारी व शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाणारी युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे स्थलांतर होणार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ही शाखा मेन रोडवर मुख्य रस्त्यावर होती, वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे तसेच खातेदारांना पार्किंगची व्यवस्था होत नव्हती, त्याच बरोबर करारही संपलेला होता. त्यामुळे देवीचामाळ रोडवरील शाहूनगर येथे सोमवार दि.14 नोव्हेंबर पासून शाखा स्थलांतर होणार असून खातेदारांनी नव्या जागेत यावे व सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे मॅनेजर टिकटे यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा