Breaking

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने स्पर्धा



शिवजयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने स्पर्धा


प्रतिनिधी

माढा तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवराय मनामनात शिवजन्मोत्सव घराघरात सजावट व देखावा स्पर्धा, जिजाऊ वेशभूषा स्पर्धा, शिवराय वेशभूषा स्पर्धा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या असल्याची माहिती तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिली.
 घराघरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान आपल्या घरी साजरा केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे फोटो, जिजाऊ वेशभूषा व शिवराय वेशभूषेचे ३ फोटो काढून व कमीत कमी १ मिनिटांचा व जास्तीत जास्त २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. माढा तालुक्यातील स्पर्धक यात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ९२०९७५२०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. घरोघरी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा हा या स्पर्धा आयोजनाचा हेतू आहे. स्पर्धा यश उद्योग समूह टेंभुर्णीचे संस्थापक-अध्यक्ष गोरख खटके-पाटील यांनी प्रायोजित केल्या आहेत. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण ऑफलाईन होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मान चिन्ह,भेटवस्तू, शिवचरित्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा