Breaking

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीनेवैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार-----



 राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने
वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार
-----------
पुणे : प्रतिनिधी दीपक बिडकर


राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल च्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार  खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यासाठी नावे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे . कोरोना साथीच्या काळात कार्यरत डॉक्टर्स ,वैद्यकीय संघटना ,कोरोना वर मात करणारे डॉक्टर्स यांचा सत्कार करण्यात करण्यात येणार आहे . तसेच कोरोना मुळे निधन पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नावे सुचविण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल च्या वतीने पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी केले आहे. यासंदर्भात   डॉ हेमंत तुसे ९८२२४५०४३७,डॉ राहुल सूर्यवंशी ९८२३०७१६१७ यांच्याशी १५ जानेवारी पर्यंत संपर्क साधता येईल
--------------------------                                                                                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा