Breaking

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

राष्ट्रवादी कडून शुक्रवारी रामवाडी येथे होणार 500 जणांना दिवाळी किटचे वाटप*


*राष्ट्रवादी कडून शुक्रवारी रामवाडी येथे होणार 500 जणांना दिवाळी किटचे वाटप*


 *अतुल वारे पाटील-करमाळा तालुका प्रतिनिधी*

करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  पक्ष तसेच मकाई सहकारी साखर कारखाना संस्थापक  चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य आप्पासाहेब झांझुर्णे यांच्या संकल्पनेतून रामवाडी ता करमाळा येथे गरजू लोकांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे.
     या किटमध्ये सॅनिटायझर, साबण, तसेच दिवाळी किराणा मालाचा समावेश असणार आहे.
तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप, जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे,करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष सर्वेश देवकर, अशपाक जमादार,महेश काळे,सचिन नलवडे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, करमाळा शहाराध्यक्षा राजश्री कांबळे तसेच राष्ट्रवादीच्या सर्व सेल चे पदाधिकारी  उपस्थित राहणार असून परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आप्पासाहेब झांझुर्णे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा